धानाच्या ‘त्या’ तीन ट्रकची १७ ला होणार सविस्तर चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:40+5:302021-08-13T04:41:40+5:30
तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या तीनही ट्रकच्या मालकांना, शेंदूरवाफा व नवरगावच्या राइस मिल ...
तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या तीनही ट्रकच्या मालकांना, शेंदूरवाफा व नवरगावच्या राइस मिल मालकांना तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून १७ ऑगस्टला चौकशीसाठी चामोर्शीत बोलावण्यात आले आहे. त्यांना एवढा वेळ कशासाठी दिला, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, चामोर्शी पोलिसांनी जप्त ट्रकचा पंचनामा केला असून धानासह ट्रक शासकीय गोदामाच्या आवारात उभे आहेत.
(बॉक्स)
...म्हणे ट्रकचालक रस्ता चुकले
शासकीय खरेदीतील धान अवैधपणे आंध्र प्रदेशच्या दिशेने कसे जात होते, याबद्दल केलेल्या प्राथमिक चौकशीत ट्रकचालकांनी आम्ही रस्ता चुकलो, असे उत्तर दिल्याची माहिती आहे. किती रस्ता चुकले तरी एकदम विरुद्ध दिशेने कोणी जात नाही. त्यामुळे या प्रकरणी बनवाबनवी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.