सिरोंचातील समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:38 PM2018-01-18T23:38:46+5:302018-01-18T23:38:59+5:30
सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गोदावरी नदीच्या पुलावर अहेरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी सिरोंचा तालुक्यातील विकासाबाबत सविस्तर चर्चा करून या तालुक्यातील समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात, असे साकडे त्यांना घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गोदावरी नदीच्या पुलावर अहेरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी सिरोंचा तालुक्यातील विकासाबाबत सविस्तर चर्चा करून या तालुक्यातील समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात, असे साकडे त्यांना घातले.
रंगय्यापल्ली येथील आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकामासाठी प्रस्तावित जागेची पाहणी करणे, बालाजी मंदिराजवळ आयोजित माता गोदादेवी श्री रंगनाथ स्वामींच्या कल्याण महोत्सवाला व तसेच कालेश्वर येथील मुक्तेश्वर कालेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी दौºयावर होते. उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे हे दोन दिवसासाठी सिरोंचा दौऱ्यादरम्यान उपविभागीय अधिकारी कर्मचाऱ्यासोबत चिंतलपल्ली जवळील गोदावरी नदीवरील पुलावरून कंनेपल्ली येथे सुरु असलेल्या बहुचर्चित मेडीगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करीत होते. यावेळी पुलावर थांबून कंकडालवार यांनी ओम्बासे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आकुला मल्लिकार्जुनराव, कृषी बाजार समिती उपसभापती सतीश गंजीवार, बानय्या जनगाम, रवी सल्लम, प्रसाद मद्दीवार, पेंटीपाका ग्रा.पं. उपसरपंच कुमरी सडवली, जाफ्राबादचे उपसरपंच कम्मम तिरुपती आदी उपस्थित होते.