तीव्र लढ्याचा अंशकालीन स्त्री परिचरांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:54+5:302021-07-07T04:44:54+5:30
सभेत जिल्हा स्तरावरुन भाऊबिज भेट मानधन वितरित करूनसुध्दा प्रा. आ. केन्द्र स्तरावरून वाटप झाले नाही. याची चौकशी करून दोषीवर ...
सभेत जिल्हा स्तरावरुन भाऊबिज भेट मानधन वितरित करूनसुध्दा प्रा. आ. केन्द्र स्तरावरून वाटप झाले नाही. याची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी. इतर कर्मचा-यांप्रमाणे प्रोत्साहनपर, अतिरिक्त मानधन लागू करणे. लसीकरण सत्रास बोलाविण्याचे मानधन अदा करावे.
कोरोना काळात आरोग्य सेविकासोबत कामे करूनसुध्दा शासन निर्णयाप्रमाणे एक हजार रुपये मानधन ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात आले नाही. आरोग्य विभागातील काही कर्मचारी परिचरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी करणे, प्रसूतीनंतर केलेल्या साफसफाईचे मानधन द्यावे, घोट येथील चंदा मडल यांचे हेतूपुरस्सर अडविलेले मानधन अदा करावे. मानधन नियमित देण्यात यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मागण्यांसाठी जिल्हा परिषद व शासनस्तरावर लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
ही सभा आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद सोनकुसरे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष अनिल मंगर, आनंद मोडक, डंबाजी कावळे, महेंद्र हुलके, अल्लीवार, निकेश संतोषवार, चंद्रकांत चहारे, पी. दुधबळे, डी. एन. सहारे, श्यामसुंदर सहारे, वाटगुरे, एल. ननावरे, रामकृष्ण भटारकर, लालाजी मेश्राम, दिनेश भगत, सी. एच. चलाख, अंशकालीन स्त्री संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष रेखा सहारे, कार्यकारी अध्यक्षा उषा मडावी, कार्याध्यक्ष वैशाली शास्त्रकार, काेषाध्यक्ष तरुणा पवार, सरचिटणीस भूमिका सेलोटे, उपाध्यक्ष पंचफुला लिंगे, सुरेखा केळझरकर, वर्षा मडावी, सहसचिव, कविता चंदनखेडे, लक्ष्मी गावळे, संगमा खोब्रागडे, ज्याेती दुर्गा, शीलाबाई रायपुरे, सुनीता फुलबांधे, सुनीता गेडाम, वर्षा मडावी, रेखा शंभरकर, प्रसिध्दीप्रमुख माधुरी काठोरे, सुनीता गेडाम, लोकमुद्रा खोब्रागडे, शामलता कुंभारे, संगीता मडावी, रेखा सहारे, वनिता भानारकर, चंदा मंडल, शेवंता मडावी, अंजली शिवरकर, सरोज लाडे, इंदिरा मादुवार, माधुरी कोठारे आदी उपस्थित हाेते.