हजारोंच्या संख्येत मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:38 AM2021-02-11T04:38:46+5:302021-02-11T04:38:46+5:30
देसाईगंज : ओबीसी समाजाचा २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे माेर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये देसाईगंज ...
देसाईगंज : ओबीसी समाजाचा २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे माेर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये देसाईगंज तालुक्यातून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सहविचार सभेत करण्यात आला.
सभेमध्ये मोर्चाच्या प्रमुख मागण्या, समाज संघटन, मोर्चाच्या प्रवासाचे नियोजन, प्रचार-प्रसिध्दी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्षा शालू दंडवते, ॲड. विजय ढोरे, जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर बुद्धे, ॲड. संजय गुरु, राजेश रासेकर, कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, पुरुषोत्तम देशकर, जगदीश बावनकर, विजय कावळे, कल्पना कापसे, नगरसेविका आशा राऊत, दिनकर बावनकर, प्रा. दामोदर सिंगाडे, प्रेमचंद मेश्राम, लोकमान्य बरडे, धनपाल मिसार, अरुण कुंभलवार, अजय पिलारे, प्रमोद झिलपे, घनश्याम पिलारे, रामजी धोटे, विलास ढोरे, राजेन्द्र बुल्ले, शहजाद शेख, प्रा. दिलीप कहुरके, पुरुषोत्तम चापले, आनंद गुरनुले, दिनकर राऊत, योगेश ढोरे, दिलीप नाकाडे, नरेश बन्सोड, मनोज रोकडे, के.एम देवाडकर, सचिन उपरे आदी हजर हाेते. संचालन सागर वाढई, प्रास्ताविक विष्णू दुनेदार यांनी तर आभार पंकज धोटे यांनी मानले.