मूलभूत क्षमता विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:33 PM2018-01-11T23:33:19+5:302018-01-11T23:33:31+5:30

शिक्षणाने माणूस प्रगल्भ व परिपूर्ण होतो. शिक्षणाच्या एकूण प्रमाणावर त्या देशाचे सांस्कृतीकरण, सामाजीकरण व राजकारणावर अवलंबून असतो. ही घडी नीट बसली तर देशाचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Develop basic capacities | मूलभूत क्षमता विकसित करा

मूलभूत क्षमता विकसित करा

Next
ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : विसोरा येथे मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला (किन्हाळा) : शिक्षणाने माणूस प्रगल्भ व परिपूर्ण होतो. शिक्षणाच्या एकूण प्रमाणावर त्या देशाचे सांस्कृतीकरण, सामाजीकरण व राजकारणावर अवलंबून असतो. ही घडी नीट बसली तर देशाचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही घडी नीट बसविण्याचे व लहान मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्राथमिक शिक्षक करीत आहेत. शिक्षकांनी या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा मूलभूत वाचन क्षमता विकसीत कराव्या, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
विसोरा येथे मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सदस शेवंता अवसरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विसोराचे उपसरपंच नितीन बन्सोड, केंद्र प्रमुख विवेक बुध्दे, ब्रह्मानंद उईके, ज्ञानेश्वर नखाते उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार गजबे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे अध्यापन करून त्यांच्यातील क्षमताचा विकास करावा. नवनवीन उपक्रम व प्रयोगाच्या माध्यमातून त्यांच्या बौध्दिक विकासास चालना द्यावी. तेव्हाच विद्यार्थी विकसीत होईल.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थित मार्गदर्शकांनीही विचार व्यक्त केले. केंद्रस्तरीय प्रशिक्षणात विसोरा, आमगाव, पोटगाव केंद्रातील ५५ शिक्षक सहभागी झाले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख ब्रह्मानंद उईके यांनी केले. प्रशिक्षणाची पार्श्वभूमी तसेच गरज याबाबत त्यांनी माहिती दिली. संचालन दिलीप नाकाडे यांनी केले. सुलभक म्हणून होमा सहारे, राजेश परशुरामकर, घनश्याम लाडे, मेघा गिरीडकर, बंडू सिडाम यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणादरम्यान विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके यांनी भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Develop basic capacities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.