बालभवनातून बालकांच्या क्षमता विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:09+5:302021-02-06T05:08:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आरमाेरी : बालकांच्या शैक्षणिक विकासाचा पाया शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रचला जातो. याच काळात त्यांच्या सर्वांगीण विकासाला ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमाेरी : बालकांच्या शैक्षणिक विकासाचा पाया शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रचला जातो. याच काळात त्यांच्या सर्वांगीण विकासाला पाेषक वातावरण निर्माण करून दिल्यास शैक्षणिक प्रगतीला गती मिळते. फुलाेरा उपक्रमांतर्गत बालभवन तयार करण्यात आले आहे. या बालभवनाच्या माध्यमातून मूलभूत क्षमता विकसित कराव्यात, असे प्रतिपादन आरमाेरीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र काेकुडे यांनी केले.
वडधा केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, टेंभाचक येथील फुलाेरा उपक्रमांतर्गत तयार केलेल्या बालभवनाचे लाेकार्पण गटशिक्षणाधिकारी काेकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत हाेते. अध्यक्षस्थानी शिक्षणविस्तार अधिकारी जी.व्ही. राठाेड, केंद्रप्रमुख एन.एस. साखरे, साधनव्यक्ती हेमंत बिसेन आदी मान्यवर उपस्थित हाेते. प्रास्ताविक मुख्याध्यापक के.डब्ल्यू. राऊत, तर संचालन शेषराव कुमरे यांनी केले. आभार मुख्याध्यापक एच.पी. कापगते यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षक आर.के. गेडाम व केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.