गाेटादेव मंदिराचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:22+5:302021-07-02T04:25:22+5:30
सिराेंचा तालुक्यात ४० वर्षांपूर्वी गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. पावसाळ्यात दोन ते तीन महिने तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटायचा. अशावेळी ...
सिराेंचा तालुक्यात ४० वर्षांपूर्वी गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. पावसाळ्यात दोन ते तीन महिने तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटायचा. अशावेळी स्थानिक आदिवासी बांधव झाडाखाली असलेल्या गाेटा देवाची पूजाअर्चा करीत हाेते. १९८० मध्ये कोपेला येथे उप पोलीस स्टेशनचे तत्कालीनचे ठाणेदार होळीकर यांनी स्थानिकांच्या मदतीने मंदिर बांधकाम केले. त्यावेळी त्यांना पोलीस कर्मचारी रमेश भासनवार, सुधाकर बत्तुला यांनीदेखील मदत केली. १९८० मध्ये या भागात पक्के रस्ते नव्हते. कनेक्टिव्हिटी नव्हती. घनदाट जंगलात पोलिसांनी कर्तव्य बजावणे आणि आदिवासींच्या मनात पोलिसांप्रति विश्वास निर्माण करणे हे खूप कठीण काम होते. दरवर्षी या मंदिरात जत्रेचे आयोजन केले जाते. कोपेला येथील पोलीस स्टेशन काही वर्षांपूर्वी झिंगानूर इथे स्थलांतरित करण्यात आले. आजही या भागात भाषेची अडचण आहे.