कोटरी पर्यटनस्थळ व विहाराचा विकास करा
By admin | Published: June 13, 2017 12:49 AM2017-06-13T00:49:15+5:302017-06-13T00:49:15+5:30
चामोर्शी तालुक्यातील कोटरी येथील बौद्ध विहाराला क पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे.
Next
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जि. प. सदस्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी तालुक्यातील कोटरी येथील बौद्ध विहाराला क पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी जि. प. सदस्य रंजीता कोडापे यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोटरी येथील अरण्यवास बुद्ध विहाराला हजारो भाविक भेटी देतात. येथे रस्ता, पिण्याचे पाणी, सभामंडप, संरक्षक भिंत व परिसराचे सौंदर्यीकरण करावे, येथील विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही जि. प. सदस्य रंजीता कोडापे यांनी म्हटले आहे.