दोरखंड विक्री व्यवसायातून साधला विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:35+5:302021-06-03T04:26:35+5:30

साधारण दोन दशकांपूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरांनाची संख्या होती. जनावरांना लागणारे दावे, कासरे गुराखी तयार करीत असत. यासाठी ...

Development led by the rope sales business | दोरखंड विक्री व्यवसायातून साधला विकास

दोरखंड विक्री व्यवसायातून साधला विकास

साधारण दोन दशकांपूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरांनाची संख्या होती. जनावरांना लागणारे दावे, कासरे गुराखी तयार करीत असत. यासाठी पळसाच्या मुळापासून वाख काढून त्याचे दावे तयार करीत किंवा बोरूपासूनही दोर दोरखंड तयार करीत असत. यातही वेगवेगळ्या कलाकुसर वापरून गुराखी दोरखंड व दावे तयार करीत असत. अलीकडे मात्र जनावरांची संख्या कमी झाली. त्यामुळे शेतकरी गुराखी ठेवणे बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दावे व इतर दोरखंड विकत घ्यावे लागत आहे .

रामसागर हे गाव गोणपाट तयार करणारे गाव म्हणून जिल्ह्यात नावारूपाला आलेले आहे. या गावातील आनंदराव चालीगांजीवार यांनी ४० वर्षांपूर्वी दोरखंड व जनावरांना लागणारे विविध साहित्य विक्री व्यवसाय सुरू केला. यासाठी चामोर्शी, घोट, आठवडी बाजारासह शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, नांदगाव, व्याहाड या आठवडी बाजारामध्ये जाऊन जनावरांना लागणारे व शेतकऱ्यांना लागणारे दोरखंड विकत असतो. बरेच शेतकरी सध्या रेडिमेड साहित्य खरेदीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत सध्या आनंदराव यांच्या व्यवसायाला चांगली बळकटी मिळत आहे. साहित्य विक्री करताना सुद्धा तो शेतकऱ्यांच्या समक्ष दोरखंड तयार करीत असतो. त्यामुळे शेतकरी आपसूकच त्याच्याकडे वळत आहेत. दिवाळी, पोळा, या सणानिमित्त आनंदराव जनावरांना लागणारे साजशृंगार साहित्य विक्रीसाठी आणत असतो. या दोन सणांना त्याची अधिक साहित्य विक्री होत असते. मात्र वर्षभर गावागावात जाऊन आनंदराव जनावरांना लागणारे साहित्य विक्री करीत असतो. या व्यवसायाला चार दशकांचा काळ लोटल्याची कबुली आनंदराव चालीगांजीवार यांनी दिली.

===Photopath===

020621\img_20210601_102338.jpg

===Caption===

दोरखंड विक्री व्यवसाय फोटो

Web Title: Development led by the rope sales business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.