विकासाभिमुख संशोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 09:27 PM2017-12-28T21:27:35+5:302017-12-28T21:28:11+5:30

२१ व्या शतकात विविध क्षेत्रात संशोधन होत असले तरी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी संशोधन झाले पाहिजे, कोणतेही संशोधन हे विकासाभिमुख असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.

Development oriented research | विकासाभिमुख संशोधन व्हावे

विकासाभिमुख संशोधन व्हावे

Next
ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : गोंडवाना विद्यापीठात संशोधन उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २१ व्या शतकात विविध क्षेत्रात संशोधन होत असले तरी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी संशोधन झाले पाहिजे, कोणतेही संशोधन हे विकासाभिमुख असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठात ‘अविष्कार-२०१७’ या विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय संशोधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बुधवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथ म्हणून प्र-कुलगुरू डॉ. सी.व्ही.भुसारी नियंत्रक डॉ. जे.व्ही.दडवे, लेखा व वित्त अधिकारी डॉ.मोहुर्ले, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया गेडाम आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी ‘अविष्कार-२०१७’ चे उद्घाटन केले.
यावेळी मान्यवरांनाही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन करिष्मा राखुंडे, प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया गेडाम तर आभार डॉ. नरेश मडावी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
१४० प्रतिकृती सादर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे १५ ते १७ जानेवारी २०१८ दरम्यान होणाऱ्या आविष्कार २०१८ च्या धर्तीवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने ‘आविष्कार २०१७’ चे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे मिळून एकूण १४० प्रतिकृती सादर करण्यात आले. यामध्ये पदवीस्तर, पदव्युत्तरस्तर तसेच शिक्षक स्तर आदी श्रेणीतील प्रतिकृतींचा समावेश होता. प्रदर्शनीत कृषी, औषधी, मानव विद्या शाखा, वाणिज्य व इतर शाखांमधील प्रतिकृती होत्या.

Web Title: Development oriented research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.