रोहयोतून धान शेतीचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:19 PM2018-05-29T23:19:52+5:302018-05-29T23:19:52+5:30
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारे टाकून दिले जात आहेत. त्यामुळे धानाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारे टाकून दिले जात आहेत. त्यामुळे धानाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
रोजगार हमी योजनेची कामे मुख्यत्वे शेती व सिंचनाशी संबंधित केली जातात. रोहयोच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढावी, हा मुख्य उद्देश आहे. वैरागड परिसरात धान शेती मोठ्या प्रमाणात आहे. रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीमध्ये पारे टाकून दिले जात आहेत. पाºयांची उंची वाढल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होते. त्यामुळे धानाच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत होत आहे.
ज्या शेतकºयांची जमीन पडिक आहे, अशा शेतकऱ्यांनाही रोहयोच्या माध्यमातून पारे टाकली जातात. पारे टाकण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च येतो. त्यामुळे गरीब शेतकरी मातीचे काम करू शकत नाही. परिणामी शेती करण्याची इच्छा असूनही जमीन पडिक राहते. रोहयोच्या माध्यमातून जमीन पीक घेण्यायोग्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होते.
रोजगार हमी योजनेच्या कामांना गडचिरोली जिल्ह्यातील मजूर व शेतकरी पंसती दर्शवितात. त्यामुळे रोजगार हमीचे कामे करणे व निधी खर्च करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. विशेष म्हणजे रोहयोची कामे वर्षभर केली जातात. उन्हाळ्यामध्ये रोजगार राहत नाही. त्यामुळे या कालावधीत मजुरांच्या मागणीप्रमाणे रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने येथील रोहयो विभाग नियोजन करते.