काॅंग्रेसच्या विचारधारेतूनच ग्रामीण भागाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:32+5:302020-12-30T04:45:32+5:30
चामाेर्शी : ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक असून त्यासाठी काॅंग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे. काॅंग्रेसच्या विचारधारेणेच ग्रामीण क्षेत्राचा विकास ...
चामाेर्शी : ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक असून त्यासाठी काॅंग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे. काॅंग्रेसच्या विचारधारेणेच ग्रामीण क्षेत्राचा विकास हाेऊ शकताेे, असे प्रतिपादन राज्याचे मदत, पूनर्वसन व बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
साेमवारी चामाेर्शी येथे आ.अभिजित वंजारी व गडचिराेली कृउबासचे प्रशासक प्रभाकर वासेकर यांच्या नागरी सत्कार साेहळ्याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी ग्रामपंचायत व नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळावाही घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डाॅ.नामदेव उसेंडी, जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, निवडणूक निरीक्षक नंदू नागरकर, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जि.प.सदस्य ॲड. राम मेश्राम, कविता भगत, रूपाली पंदिलवार, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजगाेपाल सुल्वावार आदी उपस्थित हाेते.
ग्रामपंचायत व नगर पंचायत निवडणुकीत काॅंग्रेस प्रणीत महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन ना.विजय वडेट्टीवार यांनी केले. पदवीधर व सुशिक्षित बेराेजगाराच्या समस्या जनता दरबारातून समजून घेऊन त्या साेडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, अशी ग्वाही आ.अभिजित वंजारी यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन सुरज काेडाप, गुरूदास सातपुते, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विनाेद खाेबे यांनी केले तर आभार सुमेध तुरे यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन वायलालवार, वैभव भिवापुरे, संजय वडेट्टीवार, संजय पंदिलवार, राजेश ठाकूर, विजय शातलवार, डिम्पल उंदीरवाडे, निशांत नैताम, कालिदास बुरांडे, ताेमदेव पिपरे, लाेकेेश शातलवार, शिवसेना तालुका प्रमुख अमित यासलवार, पप्पी पठाण आदी उपस्थित हाेते.