लोकोत्तर कार्यानेच समाजाचा विकास
By admin | Published: August 10, 2015 01:01 AM2015-08-10T01:01:57+5:302015-08-10T01:01:57+5:30
काही व्यक्ती इतरांच्याच कल्याणासाठी जन्म घेत असतात अशा व्यक्तींच्या लोकोत्तर कार्यानेच समाजाचा विकास घडत असतो,
सय्यद अली यांचा सत्कार : धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन
गडचिरोली : काही व्यक्ती इतरांच्याच कल्याणासाठी जन्म घेत असतात अशा व्यक्तींच्या लोकोत्तर कार्यानेच समाजाचा विकास घडत असतो, असे गौरवोद्गार भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी काढले.
स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात लिपीक सय्यद अली यांच्या सत्कारप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव महाराज, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, प्राचार्य संजय भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान धर्मराबाबा आत्राम यांच्या हस्ते सय्यद अली यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना सैनिकी विद्यालय राज्यात सर्वाेच्च पाच सैनिकी शाळांमध्ये गणले जात आहे यात सय्यद अली यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. संचालन अब्दुल रहिम पटेल तर आभार रूपेश बुरमवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)