गडचिरोलीत कोट्यवधीची विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:54 PM2017-11-28T22:54:45+5:302017-11-28T22:55:03+5:30
नगर परिषदेच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा मंगळवारी शुभांरभ करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : नगर परिषदेच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा मंगळवारी शुभांरभ करण्यात आला.
यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जेष्ठ भाजपा नेते प्रमोद पिपरे, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, नगरसेवक प्रवीण वाघरे , नगरसेविका अनिता विश्रोजवार, वैष्णवी नैताम, भाजपा पदाधिकारी देवाजी लाटकर, जनार्धन साखरे, दीपक सोमनकर, युवा कार्यकर्ता भास्कर बुरे, नरेंद्र भांडेकर, विवेक भुरसे आदी उपस्थित होते.
गडचिरोली नगर परिषदेच्या विकास निधीतून गडचिरोली शहरात विविध विकासकामे करण्यात येणार आहे. काही कामे सुरू झाली आहेत. मंगळवारी या कामांचे सुध्दा भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
या विकासकामांमध्ये नागोबा मंदिर ते अजय उरकुडे यांच्या घरापर्यंत, चामोर्शी रोड-त्रीरत्न बौध्द विहार-गलगट-तुकडोजी महाराज मंदिर, खरवटे ते चापले यांच्या घरापर्यंत, कांबळे यांच्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत, बंडीवार ते ठाकरे यांच्या घरापर्यंत, कथीले ते राऊत, रामनगर ते पोटेगाव मार्ग, चामोर्शी मार्ग ते पोटेगाव बायपास मार्ग, तसेच मोतीराम बोबाटे यांच्या घरापासून चटक डोंगरे यांच्या घरापर्यंतच्या १० रस्त्यांचे डांबरीकरण यांचा समावेश आहे.
नगरोत्थान, रस्ता अनुदान व दलित वस्ती अनुदानांतर्गत सदर कामे करण्यात येत असून यासाठी १ कोटी ११ लाख रूपयांचा निधी मंजूर आहेत.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक आमदार निधीतून इंदिरा नगर येथील देवराव बुरांडे ते शंकर नैताम ते कुळमेथे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला.