विकास कामांचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:07 AM2018-01-07T01:07:59+5:302018-01-07T01:08:14+5:30
अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या विकास कामांचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीदरम्यान घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या विकास कामांचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीदरम्यान घेतला.
या बैठकीला एटापल्लीचे एसडीओ अतुल चोरमारे, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता परांजपे, उपविभागीय अभियंता मिलींद मेश्राम यांच्यासह राज्य परिवहन विभाग, वन विभाग, तालुका भूमी निरीक्षक कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
सभेदरम्यान आलापल्ली येथील बसस्थानकाचा प्रस्ताव रेंगाळत चालला आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमधील बससेवा रस्त्यांअभावी बंद करण्यात आली आहे. ताडगाव, भामरागड, मंडळ निरीक्षण कार्यालयाचे काम शेवटच्या टप्प्यावर असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी बैठकीदरम्यान दिली.