धानपिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:18 PM2017-09-14T23:18:01+5:302017-09-14T23:18:20+5:30

कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे.

Dhanpikas Sanjivani | धानपिकांना संजीवनी

धानपिकांना संजीवनी

Next
ठळक मुद्दे३६६ एकर जागेला सिंचन : आरमोरी तालुक्यात ८७ शेततळे तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे. आरमोरी तालुक्यातील ८७ शेतकºयांकडे शेततळे असून यामुळे जवळपास ३६६ एकराला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.
मोठे जलसिंचन प्रकल्प निर्माण करणे अशक्य असल्याने शासन वैयक्तिक जलसिंचनावर विशेष भर देत आहे. याअंतर्गतच शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर विहीर, शेततळे खोदून दिले जात आहे. धानपिकाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. त्यामुळे संबंधित शेतकºयाकडे संरक्षित जलसाठा असणे अत्यंत आवश्यक आहे. आरमोरी तालुक्यातील शेतकºयांनी विविध योजनेअंतर्गत शेततळे बांधले आहेत. सुमारे ८७ शेतकºयांनी शेततळ्यांचा लाभ घेतला आहे. यावर शासनाने ६१ लाख रूपयांचे अनुदान दिले आहे. शेततळ्यांमुळे जवळपास ३६६ एकराला जलसिंचन होणार आहे. आठ दिवसांच्या पूर्वी पावसाने उसंत घेतली होती. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा कालावधीत शेतकºयांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करून धानपीक जगविले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने आणखी १५ दिवस धानाला सिंचनाची गरज आहे. तोपर्यंत शेततळ्यातील साठा संरक्षित ठेवला जाणार आहे. आकस्मिक स्थितीत या पाण्याचा वापर केला जात आहे.
काही शेतकºयांच्या शेततळ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शेततळ्यांचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे सदर शेतकरी भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकºयांना दुहेरी उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.

अडचणींच्या वेळी शेततळ्याचे पाणी धानपिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग संरक्षित जलसाठा म्हणून केला जातो. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करताना बांधिमध्ये पाणी साचेपर्यंत पाणी देऊ नये. पाण्याचा सुयोग्य वापर करावा.
- एस.पी. ढोणे,
तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

Web Title: Dhanpikas Sanjivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.