धानोरात कायदेविषयक शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:33 PM2018-02-19T23:33:56+5:302018-02-19T23:34:15+5:30
आॅनलाईन लोकमत
धानोरा : महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक समान किमान कार्यक्रमांतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालय धानोरा येथे शुक्रवारी ‘वरिष्ठ नागरिकांचे अधिकार तसेच तृतीय पंथियांच्या समस्या व उपाय’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधीसेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्या. कनिष्ठ स्तर एन. पी. वासाडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. टी. के. गुंडावार, अॅड. लोडल्लीवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी पदा उपस्थित होते. न्या. एन. पी. वासाडे यांनी वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. टी. के. गुंडावार यांनी तृतीय पंथियांच्या समस्या व उपाय यावर तर अॅड. लोडल्लीवार व पदा यांनी न्यायालयीन कामकाज प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.
संचालन एस. डी. नंदनवार यांनी तर आभार राजू गोवर्धन यांनी मानले. विधीसेवा सप्ताहामध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया विधीसेवा स्वयंसेवक यांना प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिराला सोडे येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधीसेवा प्राधिकरणचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.