धर्मरावबाबांनी घेतला काेराेनास्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:20+5:302021-05-29T04:27:20+5:30
एटापल्ली तालुक्यातील तोडसा, कसनसूर, बुर्गी, गट्टा आदी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील व ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील कोविड परिस्थितीविषयी सविस्तर ...
एटापल्ली तालुक्यातील तोडसा, कसनसूर, बुर्गी, गट्टा आदी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील व ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील कोविड परिस्थितीविषयी सविस्तर माहिती घेतली. काही अडचणी असल्यास आम्ही मदत करू, असे आश्वासन दिले. काेराेना प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आराेग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाेक आपल्याकडे केव्हा येतील, याची प्रतीक्षा न करता आपण लाेकांपर्यंत कसे पाेहाेचू, हे लक्षात घ्यावे. दुर्गम भागात काही अडचणी असल्यास गावातील भुम्या, पाटील, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन सर्वप्रथम त्यांचे लसीकरण करून नंतर इतरांचे लसीकरण केल्यास सोयीचे होईल, असे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
जातीचे दाखले, शिधापत्रिका, नवसंजीवनी योजना, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना आदींचा लाभ व लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान दिले जात आहे की नाही याविषयी चर्चा केली. दरम्यान, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी पोलीस विभागाचे उत्तम सहकार्य लाभत आहे, असे सांगितले.
या आढावाप्रसंगी जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमित बरडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनीता देवगडे, प्रभारी संवर्ग विकास अधिकारी डॉ. सचिन गव्हाणे तसेच रा.काँ.चे तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, पं.स. सदस्य बेबी लेकामी, लक्ष्मण नरोटे यांच्यासह कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.
बाॅक्स
रुग्णवाहिका उपलब्ध करणार
एटापल्ली तालुका आधीच अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. दुर्गम भागातील गावांमध्ये अद्यापही मूलभूत साेयीसुविधा पाेहाेचलेल्या नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी अडचणी येतात. ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध हाेत नसल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. यात त्यांना बराच आर्थिक भुर्दंड बसताे. यासाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाला एक रुग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याचे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. रुग्णवाहिकेमुळे जाेखमीच्या व गंभीर रुग्णांना वेळीच रुग्णालयात भरती करण्यास मदत हाेईल, असे त्यांनी सांगितले.
===Photopath===
280521\28gad_3_28052021_30.jpg
===Caption===
आढावा घेताना आ. धर्मरावबाबा आत्राम, साेबत भाग्यश्री आत्राम.