मुलाचे बॅंकेत खाते उघडले काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:40 AM2021-09-26T04:40:00+5:302021-09-26T04:40:00+5:30
शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी शासनाकडून विविध याेजना राबविल्या जातात. पहिल्या वर्गात प्रवेश करताच. त्याला पहिला लाभ गणवेशाचा दिला जाते. ...
शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी शासनाकडून विविध याेजना राबविल्या जातात. पहिल्या वर्गात प्रवेश करताच. त्याला पहिला लाभ गणवेशाचा दिला जाते. गणवेशाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. यासाठी बॅंक खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या वर्गातच अनेक पालक आपल्या पाल्याचे शासकीय बॅंकेत खाते उघडतात. पुढे हे खाते कामात येत असल्याने मुलगा पहिल्या वर्गातच असताना अनेक पालक खाते उघडतात. बालकाच्या नावाने जरी खाते असले तरी प्रत्यक्ष व्यवहार पालकाला करता येतात.
बाॅक्स
या याेजनांसाठी खाते आवश्यक
१) शालेय गणवेशाचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा केले जाते.
२) मुलींना उपस्थिती भत्ता दिला जाते. उपस्थिती भत्त्यासाठी ंंेंबॅंक खाते आवश्यक आहे.
३) पाचवी व आठवीत शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना लाभ दिला जाते.
बाॅक्स
खाते काढताना येणाऱ्या अडचणी
- गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या विरळ आहे. लाेकसंख्या व विस्ताराच्या तुलनेत बॅंकांची संख्या कमी आहे. त्यामुळे बॅंक खाते काढण्यासाठी काही गावातील नागरिकांना ५० ते ६० किमी अंतर पार करून पुढे जावे लागते.
- बऱ्याचवेळा बॅंक लिंक फेल राहते. त्यामुळे आर्थिक व्यवहार हाेत नाही.
- एखाद्या व्यक्तीने बॅंक खाते काढले तरी बॅकेत पैसे काढण्यासाठी येणे शक्य हाेत नाही.
बाॅक्स
पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी- १,३१,६२४
बॅक खाते उघडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या- १,०९,२४७
बाॅक्स
काेराेनामुळे याेजना प्रभावीत
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध याेजनांचा लाभ दिला जाते. मागील वर्षीपासून काेराेनामुळे शासनाच्या अनेक याेजना प्रभावीत झाल्या आहेत. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना अजूनपर्यंत गणवेश मिळाले नाहीत. शिक्षकांचे प्रशिक्षण थांबले आहेत. काही शाळांमध्ये तर अजूनपर्यंत पुस्तकेही पाेहाेचले नाहीत.