एसटी बसच्या फेऱ्यांना डिझेल तुटवड्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:18+5:30

डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जुळवाजुळव करून पैसे भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे टँकर शनिवारी दुपारी ४ वाजता पोहोचला.

Diesel shortages hit ST bus rounds | एसटी बसच्या फेऱ्यांना डिझेल तुटवड्याचा फटका

एसटी बसच्या फेऱ्यांना डिझेल तुटवड्याचा फटका

Next
ठळक मुद्देमहामंडळाची आर्थिक स्थिती गंभीर। गडचिरोलीतील काही फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली आगारातील डिझेल संपल्याने शनिवारी दुपारच्या सुमारास काही बसफेºया रद्द कराव्या लागल्या. परिणामी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
गडचिरोली बस आगार हे जिल्हास्तरावरील आगार आहे. त्यामुळे या आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस जिल्ह्यातील दुर्गम भागात बसेस सोडल्या जातात. गडचिरोली आगारात एकूण १०९ बसगाड्या आहेत. या बसगाड्यांना दरदिवशी सुमारे सहा हजार लिटर डिझेल लागते. १२ हजार लिटरचे टँकर दोन दिवसात संपते. त्यामुळे दर दिवशी किंवा एक दिवसाआड डिझेलचे टँकर संपते. डिझेलची मागणी करण्यासाठी विभागीय कार्यालयामार्फत इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या खात्यावर आॅनलाईन पध्दतीने पैसे टाकले जातात. त्यानंतर इंडियन ऑईल कार्पोरेशन डिझेलचे टँकर संबंधित आगाराला पाठविते. सध्या एसटी प्रचंड तोट्याचा सामना करीत आहे. डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जुळवाजुळव करून पैसे भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे टँकर शनिवारी दुपारी ४ वाजता पोहोचला. आगारातील डिझेल ११ वाजताच संपले होते. डिझेल संपल्याने अनेक महत्त्वाच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वीही दोन ते तीन दिवस आगारातील डिझेल संपले होते. तेव्हाही बऱ्याच बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. आजपर्यंत प्रवाशांनी वाहक व चालक नसल्याने बसफेरीला उशीर होत आहे, या गोष्टी ऐकल्या होत्या. आता मात्र डिझेलच संपल्याने बस फेऱ्या रद्द होत असल्याचे प्रवाशी ऐकत आहेत. त्यामुळे त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसत चालला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्राची लोकवाहिणी म्हणून ओळख मिळालेल्या एसटीला एसटीला टाळे ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवशाहीने तोटा वाढला
गडचिरोली आगाराला दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिले आहेत. या बसमध्ये केवळ पाच ते दहा प्रवाशी बसून जातात. यामुळे डिझेलचा खर्च तर सोडाच वाहक व चालकाचे वेतन करणेही कठीण झाले आहे.

Web Title: Diesel shortages hit ST bus rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.