कटेझरी परिसरातील वन कर्मचारी निवासस्थाने जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:30+5:302021-06-02T04:27:30+5:30

धानाेरा : वन परिक्षेत्र पूर्व मुरुमगाव अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील बीट वनरक्षकांची निवासस्थाने सध्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी ती ...

Dilapidated forest staff residences in the Katzari area | कटेझरी परिसरातील वन कर्मचारी निवासस्थाने जीर्ण

कटेझरी परिसरातील वन कर्मचारी निवासस्थाने जीर्ण

Next

धानाेरा : वन परिक्षेत्र पूर्व मुरुमगाव अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील बीट वनरक्षकांची निवासस्थाने सध्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी ती काेसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी तालुका व जिल्हा मुख्यालयातून ये-जा करीत असतात. सदर निवासस्थानांकडे दुर्लक्ष हाेत आहे.

धानाेरा तालुक्यातील मुरुमगाव, गजामेंढी, सावरगाव, ग्यारापत्ती, कटेझरी, येरकड, पन्नेमारा आदी गावातील बीट गार्डचे निवासस्थान जीर्णावस्थेत आहेत. शासनाच्यावतीने लाखाे रुपयांचा खर्च करून कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध करून दिली जातात. परंतु त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने अल्पावधीतच दुरवस्था हाेते. मुरुमगाव वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अनेक गावातील वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तालुका व जिल्हा मुख्यालयातून ये-जा करतात तर काही कर्मचारी आठवड्यातून एकदाच कर्तव्यावर दिसतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत असल्याने वनाचे संरक्षण कसे हाेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

विशेष म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी भत्ता दिला जाताे. परंतु ते मुख्यालयी न राहता भत्ता उचलतात. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मात्र स्वतंत्र निवासस्थाने शासनाने बांधून दिली आहेत. परंतु या निवासस्थानांमध्ये ते राहत नाही. वन मजूर तसेच चाैकीदारांच्या माध्यमातून जंगलाचे संरक्षण अनेक ठिकाणी हाेत असल्याचे चित्र वारंवार उघडकीस आले आहे. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने वन कर्मचाऱ्यांचेही फावले आहे. दुरवस्थेत असलेल्या निवासस्थानांची दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्तीचे करावे, अशी मागणी आहे.

बाॅक्स .....

विविध वस्तू गायब

वन कर्मचाऱ्यांसाठी काही वर्षांपूर्वी बांधलेल्या निवासस्थानांची स्थिती सध्या दयनीय झाली आहे. येथील दरवाजे, खिडक्या चाेरीला गेल्या असून इमारती पडक्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित केल्याचे दिसून येते. त्यामुळे दुरवस्था झालेल्या निवासस्थानांमध्ये वन कर्मचारी राहणार कसे, असा प्रश्नही निर्माण हाेत आहे.

===Photopath===

010621\01gad_4_01062021_30.jpg

===Caption===

दुरवस्थेत असलेले कटेझरी नं. २ येथील वन कर्मचारी निवासस्थान

Web Title: Dilapidated forest staff residences in the Katzari area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.