कटेझरी परिसरातील वन कर्मचारी निवासस्थाने जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:05+5:302021-07-07T04:45:05+5:30
धानाेरा : वन परिक्षेत्र पूर्व मुरुमगावअंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील बीट वनरक्षकांची निवासस्थाने सध्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी ती काेसळण्याची ...
धानाेरा : वन परिक्षेत्र पूर्व मुरुमगावअंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील बीट वनरक्षकांची निवासस्थाने सध्या जीर्णावस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी ती काेसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाचे बहुतांश अधिकारी, कर्मचारी तालुका व जिल्हा मुख्यालयातून ये-जा करीत असतात. या निवासस्थानांकडे दुर्लक्ष हाेत आहे.
तालुक्यातील मुरुमगाव, गजामेंढी, सावरगाव, ग्यारापत्ती, कटेझरी, येरकड, पन्नेमारा आदी गावातील बीट गार्डचे निवासस्थान जीर्णावस्थेत आहेत. शासनाच्यावतीने लाखाे रुपयांचा खर्च करून कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उपलब्ध करून दिली जातात. परंतु त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने अल्पावधीतच दुरवस्था हाेते. मुरुमगाव वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अनेक गावातील वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. तालुका व जिल्हा मुख्यालयातून ये-जा करतात, तर काही कर्मचारी आठवड्यातून एकदाच कर्तव्यावर दिसतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत असल्याने वनाचे संरक्षण कसे हाेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.