वाघीण मृत्यूप्रकरणी शेतकºयांना वनकोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:58 PM2017-11-06T22:58:40+5:302017-11-06T22:58:53+5:30
चामोर्शी तालुक्यातील मारोडा-जामगिरीच्या जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी दोन शेतकºयांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मारोडा-जामगिरीच्या जंगलातील शेताजवळ शुक्रवारी पहाटे मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी दोन शेतकºयांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी दिली.
मिथून मनोरंजन मंडळ (रा.नवग्राम) आणि संतोष वारलू कुळमेथे (रा.जामगिरी) अशी अटक केलेल्या शेतकºयांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी वीजवाहक तारा लावल्याची कबुली वनाधिकाºयांना दिली, मात्र वाघिणीची शिकार करणे हा आपला उद्देश नव्हता तर श्वापदांपासून पिकांचे संरक्षण हा उद्देश होता असे त्यांनी सांगितले.
वाघ प्रवर्गातील प्राण्याचा मृत्यू हा वन्यजीव विभागासाठी गंभीर विषय आहे. त्यामुळे शिकारीचा उद्देश नसला तरी वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे वन्यजीव विभाग हादरून गेला आहे. चपराळा अभयारण्यात सोडलेल्या त्या वाघिणीसह एका रानडुकराचा शेताभोवती लावलेल्या तारांमधील वीजप्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने तीन शेतकºयांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघांना अटक केली. सोमवारी त्यांना चामोर्शी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. जंगली स्वापदापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी जंगलालगतच्या परिसरातील शेतात अनेक जण वीज वाहक तारा लावत असतात.