विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:23+5:30

एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही.

Dirt everywhere in the separation room | विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

Next
ठळक मुद्देस्वच्छतेकडे दुर्लक्ष : एटापल्लीच्या आयटीआयमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : परजिल्हा व राज्यातून परतलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र एटापल्ली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात नागरिकांसाठी योग्य सोयी, सुविधा नाहीत. त्यातच विलगीकरण कक्षाला घाणीचा विळखा आहे. अनेक खोल्यांमध्ये घाण असून दुर्गंधी येत आहे. तसेच शौचालयसुद्धा दुर्गंधीयुक्त असतानाही येथे नागरिकांना राहावे लागत आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. मात्र आयटीआयमधील विलगीकरण कक्षात स्वच्छतेचा अभाव आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. परिणामी दुर्गंधीतच नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करावा लागत आहे. येथील स्वच्छता नियमित केली जात नाही. सफाईगार आल्यास बाहेरूनच झाडू मारून निघून जातात. येथील शौचालय, बाथरूम, बेसिनमध्ये घाण आहे. त्यामुळे टाकलेले पाणी झिरपत नाही. फरश्यांचीसुद्धा साफसफाई करून पुसल्या जात नाही.
विशेष म्हणजे, अनेक प्रवाशांना एकच शौचालय व बाथरूमचा वापर करावा लागत आहे. वेगवेगळी व्यवस्था नसल्याने बाधित रूग्ण आढळल्यास सर्वांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध कारणांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्ष वादग्रस्त ठरले आहे. काही नागरिकांनी येथील अस्वच्छतेचे फोटो मोबाईलद्वारे काढून नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग यांना पाठविले. तसेच समाज माध्यमांवरसुद्धा झळकले. तेव्हा तेलंग यांनी विलगीकरण कक्षाला भेट देऊन पाहणी करीत संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. विलगीकरण कक्षाला अद्यापही घाणीचा विळखा आहे.
विशेष म्हणजे, १३ जून २०२० ला येथे ठेवण्यात आलेल्या दोघांनी पळ काढला होता. मात्र एक जण अध्या तासातच परतला. तर दुसरा पहाटेच्या सुमारास परत आला. एवढी मोठी घटना घडूनही याबाबत कोणत्याही व्यक्तीने बाहेर वाच्यता केली नाही.

नागरिकांच्या अनेक तक्रारी
विलगीकरण कक्षातील असुविधांमुळे १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. येथील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात नाही. तसेच नागपूर रेड झोनमधून आलेल्या काही लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले तर काही लोकांना गृह विलगीकरणात करण्यात आले. अशा प्रकारचा दुजाभाव का करण्यात आला, असा सवालही नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, येथील नागरिकांना योग्य प्रकारे मिळत नाही. केवळ वरणभात व पोळी वारंवार भोजनात दिली जात असल्याचीसुद्धा तक्रार आहे.

Web Title: Dirt everywhere in the separation room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.