दिव्यांगांना मिळाले शेळी व कुक्कुटपालनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:39 AM2021-09-18T04:39:42+5:302021-09-18T04:39:42+5:30
प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रसाद भामरे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार, ...
प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रसाद भामरे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार, प्रकल्पाचे व्यवस्थापक मुकेश शेंडे, समन्वयक मनोज मेश्राम, आदिवासींचे शाश्वत उपजीविका प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक तन्मय भोयर उपस्थित होते. यावेळी डॉ. सतीश गोगुलवार यांनी दिव्यांगांच्या उत्थानाकरिता त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता पाठपुरावा केला जात आहे, असे सांगितले. तर पशुधन अधिकारी डॉ. प्रसाद भामरे यानी शेळीपालन कुक्कुटपालनाकरिता आवश्यक तांत्रिक बाबी सांगत जनावरांसाठी विमा योजना तसेच शासकीय अनुदान योजनेची माहिती दिली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार विषयाच्या समन्वयक संगीता तुमडे, महेश निकुरे, लक्ष्मण लंजे यांनी सहकार्य केले.
170921\1746-img-20210917-wa0077.jpg~170921\1746-img-20210917-wa0077.jpg
कूरखेडा येथे दिव्यांग व्यक्ती शेळी व कूक्कटपालन प्रशिक्षण शिबीर~कूरखेडा येथे दिव्यांग व्यक्ती शेळी व कूक्कटपालन प्रशिक्षण शिबीर