याेजनांच्या लाभासाठी दिव्यांगांनी लढा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:54+5:302021-08-19T04:39:54+5:30
कार्यक्रमाला पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नीलेश बारसे, सरपंच वासुदेव उसेंडी, पोलीस पाटील शिवकुमार भैसारे, तालुका धानोरा दिव्यांग संघटनेचे ...
कार्यक्रमाला पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नीलेश बारसे, सरपंच वासुदेव उसेंडी, पोलीस पाटील शिवकुमार भैसारे, तालुका धानोरा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मारभते, सामाजिक कार्यकर्ते सोपानदेव मशाखेत्री, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे केंद्र समन्वयक लक्ष्मण लंजे, त्रिकाल नेत्र ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण टेंभुर्णे, उपाध्यक्ष अतुल शिंपी, सचिव बारीकराव सहारे, प्रदीप सहारे, चरणदास भैसारे, श्वेता जोगधुर्वे उपस्थित होते. याप्रसंगी प्रभारी अधिकारी नीलेश बारसे यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत स्तरावरून ५ टक्के निधीची तरतूद, कुटुंबात दिव्यांगांचा समावेश असल्यास ५० टक्के सुट, तसेच दिव्यांगांना घरकुल योजनांची तरतूद शासनस्तरावरून केल्या गेली असल्याची माहिती दिली. संचालन व प्रास्ताविक लक्ष्मण लांजे यांनी केले, तर आभार शिवकुमार भैसारे यांनी मानले.
180821\img-20210818-wa0003.jpg
येरकड येथिल कार्यक्रम