आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:23 AM2018-02-24T01:23:23+5:302018-02-24T01:23:23+5:30
आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच आपत्तीतून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात, आग लागणे अशा विविध आपत्तीचे प्रमाण वाढले .....
ऑनलाईन लोकमत
आरमोरी : आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच आपत्तीतून बचाव करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची आहे. भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात, आग लागणे अशा विविध आपत्तीचे प्रमाण वाढले असून अशा नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय यातून उत्तम स्वयंसेवक निर्माण व्हावे, या उद्देशाने स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार यशवंत धाईत, सहायक पोलीस निरीक्षक महारूद्र परजने, प्राचार्य विनोद धारगावे, संदीप लांजेवार, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. उत्तमचंद मुंगमोडे उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती शिबिरात प्रशिक्षक म्हणून मॅनेजर आॅपरेटर मार्केटिंग असोसिएट्स नागपूरचे मोझेश कोंडरा, रेड क्रॉस ट्रेनर अविनाश चडगुलवार उपस्थित होते. कोंडरा यांनी आगीमुळे कशाप्रकारे बचाव करता येईल याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. तसेच भूकंप, पूर, ढगफुटी, वादळ, विजा, आग, वायूगळती, भूस्खलन, अपघात, फ्रॅक्चर, भाजणे, विंचू चावणे, साप चावणे अशा विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे कसे जाता येईल याची चित्रफितीद्वारे माहिती दिली. चडगुलवार यांनी प्राथमिक उपचार पद्धती सांगितली. प्रास्ताविक उत्तमचंद कांबळे, संचालन विजय रैवतकर तर आभार ज्ञानेश्वर ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. सीमा नागदेवे, गजेंद्र कढव, अमिता बन्नोरे, चंद्रकांत डोर्लीकर, दिलीप घोनमोडे, सतेंद्र सोनटक्के, विजय गोरडे, स्नेहा मोहुर्ले, गजानन बोरकर, दयाराम मेश्राम, बाबुराव शेंडे, रमेश इंकणे, खुशाल रामटेके, प्रशांत दडमल, सचिन ठाकरे यांनी सहकार्य कले.