बालपणीच आपत्ती निवारणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:53 PM2018-08-26T23:53:10+5:302018-08-26T23:54:59+5:30

जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अधिक आहे.

Disaster prevention lessons at the earliest childhood | बालपणीच आपत्ती निवारणाचे धडे

बालपणीच आपत्ती निवारणाचे धडे

Next
ठळक मुद्देहजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) व शाळेच्या पुढाकाराने जिल्हाभरातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. त्याचबरोबर नदीनाल्यांची संख्या अधिक आहे. अख्या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात केवळ चार ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. अग्निशमन यंत्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने घर, इमारत जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची नैैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास स्वत:चा बचाव करण्याबरोबरच दुसऱ्यांचा बचाव करता येणे आवश्यक आहे. आपत्तीचे निवारण करताना काही तांत्रिक बाबीनुसार प्रयत्न करावा लागतो. मात्र विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांनाही याची माहिती राहत नाही. विद्यार्थी हे समाज व कुटुंबांचे सदस्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले तर त्याची माहिती ते आपल्या कुटुंबियांना व समाजाला देऊ शकतील. आपत्ती निवारण करण्यासाठी स्वतंत्र विभाग असला तरी या विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे या विभागामार्फत आपत्ती निवारणाचे धडे देणे शक्य नाही.
आपत्ती निवारण व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन जिल्हा शैक्षणिक सातत्त्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्याचा संकल्प केला. त्यानुसार नियोजन केले. २५ आॅगस्ट रोजी शाळांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्यावे, असे निर्देश डॉ. शरदचंद्र पाटील यांनी शाळांना दिले. त्या दिवशी शक्य न झाल्यास पुढील तारखेत कोणत्याही दिवशी प्रशिक्षण द्यावे. मात्र प्रत्येक शाळेने प्रशिक्षण आयोजित करणे अनिवार्य केले आहे.
यासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा सुद्धा घेण्यात आली. डीआयईसीपीडीचा आदेश धडकताच जिल्हाभरातील जवळपास ७० टक्के शाळांनी शनिवारीच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित केले. काही अपरिहार्य कारणांमुळे काही शाळांनी प्रशिक्षण आयोजित केले नाही. या शाळा आता सोमवारी किंवा मंगळवारी प्रशिक्षण आयोजित करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान ३० ते ५० विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला केला गेला. त्या गटासाठी एक सुलभ नेण्यात आला. पाचवी ते आठवीसाठी ५० प्रश्न असलेली पुस्तिका सुलभकाकडे देण्यात आली. सुलभक प्रत्येक प्रश्न वाचून विद्यार्थ्यांना सांगतो. प्रश्नानंतर चार पर्याय दिले असून त्यातील सर्वात योग्य कोणता पर्याय आहे, याची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे. विद्यार्थ्यांनी सदर पर्याय निवडल्यावर हाच पर्याय का बरोबरच आहे. यावर सुलभक विद्यार्थ्यासोबत चर्चा करेल. या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.

विद्यार्थी हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांना जर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यास ते प्रशिक्षण संपूर्ण समाजासाठी उपयोगात येईल. एका विद्यार्थ्यामुळे शेकडो नागरिकांचे जीवन वाचण्यास मदत होईल. आपत्ती व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण आहे. आपत्ती व्यवस्थापनाची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला. प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाºयांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आजच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थी व समाजाला निश्चितच लाभ होईल.
- डॉ. शरदचंद्र पाटील, प्राचार्य, डीआयईसीपीडी

Web Title: Disaster prevention lessons at the earliest childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.