सूचना रद्द करून वेतन देयके स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:27 AM2019-02-04T00:27:28+5:302019-02-04T00:28:47+5:30

बायोमेट्रिक पावती, फोटो तसेच दंतरोग तज्ज्ञांकडून मुख व दंत तपासणीचा अहवाल वेतन देयकासोबत जोडण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी कार्यालयाने केल्या आहेत. परिणामी वरील बाबी जोडून वेतन देयके सादर करण्यास अडचणी येत आहे.

Disclaimer and accept salary payments | सूचना रद्द करून वेतन देयके स्वीकारा

सूचना रद्द करून वेतन देयके स्वीकारा

Next
ठळक मुद्देविमाशिसंची मागणी : निवेदनातून आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बायोमेट्रिक पावती, फोटो तसेच दंतरोग तज्ज्ञांकडून मुख व दंत तपासणीचा अहवाल वेतन देयकासोबत जोडण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी कार्यालयाने केल्या आहेत. परिणामी वरील बाबी जोडून वेतन देयके सादर करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे या सूचना रद्द करून शिक्षकांची पूर्वीप्रमाणेच वेतन देयके स्वीकारण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत वेतन पथकात १८ जानेवारी रोजी सूचना लावण्यात आली. यामध्ये वेतन देयकासोबत बायोमेट्रिक लावल्याची पावती, फोटो तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची दंतरोग तज्ज्ञांकडून मुख व दंत तपासणीचा अहवाल जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०१९ च्या वेतनात या सर्व बाबी जोडण्याच्या सूचना करण्यात आली आहे. राज्यशासनाकडून या दोन्ही बाबी आवश्यक करण्यात आल्या नाही. केवळ गडचिरोली जिल्ह्यात मुख व दंत तपासणीचा अहवालाचा बाहू केला जात आहे. प्रत्येक बाबीला शिक्षकच जबाबदार का धरले जातात, असा सवाल विमाशिसंने उपस्थित केला आहे.
निवेदन देताना अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्याध्यक्ष कैलास भोयर, कार्यवाह अजय लोंढे, माणिक पिल्लारे, रवींद्र बांबोळे, चोखाजी भांडेकर, यशवंत रायपुरे, गजानन बारसागडे, विनोद सालेकर, यादव बानबले, रेवनाथ लांजेवार, सुरेंद्र मामिडवार आदी उपस्थित होते.

Web Title: Disclaimer and accept salary payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.