शेतीच्या नवीन तंत्रज्ञानावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:06 AM2017-10-18T00:06:32+5:302017-10-18T00:06:58+5:30

महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा जीवन ज्योती लोक संचालिक साधन केंद्र वैरागडची वार्षिक सभा समाजमंदिर सभागृहात पार पडली. शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे.

Discuss on farming new technology | शेतीच्या नवीन तंत्रज्ञानावर चर्चा

शेतीच्या नवीन तंत्रज्ञानावर चर्चा

Next
ठळक मुद्देसाधन केंद्राची सभा : तालुका कृषी अधिकाºयांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा जीवन ज्योती लोक संचालिक साधन केंद्र वैरागडची वार्षिक सभा समाजमंदिर सभागृहात पार पडली. शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच गौरी सोमनानी, तालुका कृषी अधिकारी एस.पी. ढोणे, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, ग्रामपंचायत सदस्य नलिनी आत्राम, नलिनी सहारे, प्रा. प्रदीप बोडणे, कांता मिश्रा, संगीता हुर्रे, उत्तरा मारगाये, मोहन धनोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी ढोणे म्हणाले, शेतीचे स्वरूप बदलत चालले आहे. शेतकरी परंपरागत शेतीकडून नव्या शेतीकडे वळत चालला आहे. शेतीला पुरक असे उद्योग करणे आवश्यक आहे. आधुनिक शेती पुरूषांपेक्षा महिलांचा सहभाग वाढत चालला आहे. असे प्रतिपादन केले. संचालन सुषमा नरूले, प्रास्ताविक यामिनी मातेरे तर आभार भाविका सयाम यांनी मानले.

Web Title: Discuss on farming new technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.