उपाध्यक्षांची कर्मचाºयांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:45 PM2017-10-20T23:45:02+5:302017-10-20T23:45:16+5:30
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
एसटी कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उगारल्याने मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. संपाच्या कालावधीत शासनाने खासगी वाहतुकदारांना प्रवाशांची वाहतूक करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र खासगी वाहतुकदार संपाचा दुरूपयोग करीत आहेत. दामदुप्पट तिकीट घेत आहेत. खासगी वाहतूक सुरक्षितसुद्धा नाही. त्यामुळे शासनाने खासगी वाहतुकीचा अवलंबलेला मार्ग चुकीचा असल्याची टीका सुद्धा केली. एसटी असल्यामुळेच खासगी वाहतुकदारांवर नियंत्रण आहे. वाढत्या महागाईनुसार शासनाने एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ द्यावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन दिले.