नवीन पिके घेण्याविषयी चर्चा
By admin | Published: January 8, 2017 01:35 AM2017-01-08T01:35:12+5:302017-01-08T01:35:12+5:30
जिल्ह्यातील वातावरण व जमिनीचा पोत लक्षात घेऊन नवीन पिकांचे उत्पादन घेण्याविषयी कृषी तंत्रज्ञान
आत्माचा पुढाकार : शेतकरी सल्लागार समितीची पहिली बैठक
गडचिरोली : जिल्ह्यातील वातावरण व जमिनीचा पोत लक्षात घेऊन नवीन पिकांचे उत्पादन घेण्याविषयी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) शेतकरी सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सदर बैठक प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला पालकमंत्र्यांचे नियुक्त सदस्य गिरीष मद्देर्लावार, सुनिल बिश्वास, मुतय्या नरवेधी, सीरिया गावडे, वंदना गावडे, देवेंद्र मुनघाटे, अनिल पाटील, केवळराम म्हशाखेत्री, ज्योती कुदेशी, माधुरी बोरकर, गणपती सातपुते, अनूप दास, ताराबाई धनबाते, भरत बगमारे, शालिकराम नाकाडे, संजय चौधरी, ऋषी घरते, रमेश पिल्लारे उपस्थित होते. बैठकीदरम्यान कृषी तंत्रज्ञानाची उणीव व आत्माच्या मार्फतीने राबवायाचे प्रकल्प याविषयी चर्चा केली. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथे राबविण्यात आलेल्या प्लास्टिकवरील भात पीक लागवडी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्य शेती जिल्ह्यातील पशुधनाची वंशवृध्दीद्वारे अधिक उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी सदस्यांनी केली. नागली, नाचणी पिकांचे प्रात्यक्षिके, भाजीपाला लागवड, मोकाट गुरे व जंगली प्राणी यांपासून रबी पिकांचा बचाव कसा करता येईल. याबाबत विचार विनिमय करण्यात आला. कृषी पणन तज्ज्ञ प्रशांत ढवळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जांभुळकर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक बन्सोड, सहायक अधीक्षक गेडाम, लेखापाल कापगते, संगणक सहायक गुरूकर, संगणक आज्ञावली रूपरेषक गायकवाड यांनी बैठक आयोजित करण्याबाबत सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)