मन्नेराजाराम ग्रामसभेत तेंदू हंगामाबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:21 AM2019-03-09T01:21:48+5:302019-03-09T01:22:56+5:30
तालुक्यातील मन्नेराजाराम येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तेंदूपत्त्याच्या हंगामाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य इंदरशहा मडावी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत तेंदूपत्त्याच्या हंगामाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या तेंदू हंगामासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य इंदरशहा मडावी उपस्थित होते.
ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर मडावी, गोटुल समितीचे अध्यक्ष रामय्या सडमेक यांच्यासह सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. यावर्षी तेंदूपत्त्याचे चांगले उत्पादन व्हावे, यासाठी बेलकटाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेंदूपत्त्याच्या लिलावाची प्रक्रिया ग्रामसभेने सुरू केली. मात्र लिलावात ठेकेदारांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे काही गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. तेंदूपत्त्याचा लिलाव जरी उशीरा होणार असला तरी तेंदूपत्ता अधिक प्रमाणात व्हावा, यासाठी पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी सोमवारपासून बेलकटाई करण्याचा निर्णय घेतला. उत्तम दर्जाचा तेंदूपत्ता येण्यासाठी बेलकटाई होणे आवश्यक आहे, अशी माहिती इंदरशहा मडावी यांनी दिली.
मागील वर्षी तेंदूपत्त्याला अत्यंत कमी प्रमाणात भाव मिळाला होता. तालुक्यातील काही गावांमधील तेंदूपत्ता खरेदी करण्यासाठी ठेकेदारांनी सहभागच घेतला नव्हता. त्यामुळे अनेक गावांचे लिलाव झाले नाही. तेंदूपत्ता चांगला असतानाही त्याची तोड झाली नाही. परिणामी ग्रामसभेला रॉयल्टीवर पाणी सोडावे लागले. तसेच गावातील मजुरांचाही रोजगार बुडाला होता. ही परिस्थिती यावर्षी येऊ नये, यासाठी बºयाच ग्रामसभा प्रयत्न करीत आहेत.