गुरूदेव शाळेच्या हस्तांतरणावर चर्चा
By Admin | Published: May 8, 2017 01:43 AM2017-05-08T01:43:11+5:302017-05-08T01:43:11+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील शाळेच्या
पदाधिकारी हजर : अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील शाळेच्या हस्तांतरणाबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शाळेच्या हस्तांतरणाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बैठकीला खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या शाळेच्या हस्तांतरणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून कायम आहे. सदर शाळेचा ताबा गुरूदेव सेवा मंडळाकडे द्यावा, यासाठी गुरूदेवभक्तांचा लढा सुरू होईल. परंतु शाळा हस्तांतरणाबाबत अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे खा. नेते यांच्या नेतृत्त्वात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रालयात भेट घेऊन कमलापूर शाळेबाबत बाजू मांडली. ना. मुनगंटीवार यांनी शाळेबाबत लवकरच योग्य तो निर्णय शासनस्तरावरून घेण्याचे आश्वासन अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले.