कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सीईओंशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:25+5:302021-07-27T04:38:25+5:30
केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. प्राथमिक शिक्षकांच्या निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करून निवड ...
केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. प्राथमिक शिक्षकांच्या निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करून निवड श्रेणी लागू करावी. कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे. सेवानिवृत्त व मय्यत ग्रामसेवकांची पेन्शन व इतर आनुषांगिक लाभ मंजूर करावे. ग्रामसेवक व इतर संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्ष कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव मागवून ते मंजूर करावे. दिव्यांगाचा अनुशेष भरण्यात यावा. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनापोटी तसेच वैद्यकीय परिपूर्ती योजनेसह रजेचे बिल काढण्यासाठी पगाराव्यतिरिक्त जादा रक्कम शासनाकडून मागविण्यात यावी. बी. डी. एस.प्रणाली बंद असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे बी.डी.एस.प्रणाली सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करावा. आदी मागण्यांचे निवेदन देऊन या मागण्यांवर चर्चा केली. स्थानिक स्तरावरील समस्या साेडविल्या जातील. तसेच शासन स्तरावरील समस्या साेडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन सीईओ आशीर्वाद यांनी दिले.
निवेदन देतेवेळी कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष राजकुमार घाेडेस्वार, विभागीय उपाध्यक्ष देवानंद फुलझेले, रायसिंग राठाेड, जीवन सलामे, दिगांबर डाेर्लीकर, विद्युतलता भानारकर आदी उपस्थित हाेते.