आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:40 AM2017-10-25T00:40:28+5:302017-10-25T00:40:39+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्यांबाबत ओबीसी नेत्यांनी खा. अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्यांबाबत ओबीसी नेत्यांनी खा. अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली.
जिल्ह्यातील नॉन पेसा क्षेत्रात १२ संवर्गातील पदांसाठी १९ टक्के आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण सर्व संवर्गातील पदांना लागू करावे, ५१ टक्के पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेली गावे पेसातून वगळण्यात यावी आदी ओबीसींच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करावे, या मंडळाच्या मार्फत वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्यात यावी, राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, गडचिरोली जिल्ह्याला विकास कामांमध्ये प्राधान्य देऊन जास्तीत जास्त विकास कामे करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाही करण्यात आली. शिष्टमंडळात खा. अशोक नेते यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी उपसभापती केशव भांडेकर, नगरसेवक रमेश भुरसे, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, भास्कर बुरे उपस्थित होते.