धम्म सहविचार सभेत आचरणावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:43 AM2021-09-08T04:43:47+5:302021-09-08T04:43:47+5:30
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे मुख्य संघटक हंसराज लांडगे, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत, बुद्धिस्ट सोसायटीचे महासचिव धम्मराव ...
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे मुख्य संघटक हंसराज लांडगे, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत, बुद्धिस्ट सोसायटीचे महासचिव धम्मराव तानादू, सल्लागार अशाेक गडकरी, धम्मानंद मेश्राम, उपविभागीय अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री, सचिव राजेंद्र कोडापे, कोअर कमिटी सदस्य दर्शना मेश्राम, भीमराव शेंडे, संगीता पाटील, दर्शना शेंडे आदी हजर हाेते.
सभेत बुद्धिस्ट सोसायटीच्या १० उद्दिष्टांवर हंसराज लांडगे यांनी मार्गदर्शन केले तर चंदुराव राऊत यांनी २२ प्रतिज्ञांचे वाचन केले. सभेदरम्यान दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची गडचिरोली तालुका शाखा गठित करण्यात आली. सभेचे संचालन जिल्हा शाखेच्या कोषाध्यक्षा विभा उमरे यांनी, प्रास्ताविक धम्मराव तानादू यांनी तर आभार तारका जांभुळकर यांनी मानले.
बाॅक्स
तालुका कार्यकारिणी गठित
गडचिरोली तालुका शाखेच्या अध्यक्षपदी ज्ञानोदय वाळके तर सचिवपदी सतीश बडोले यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षा दुर्लभा बांबोळे, लक्ष्मण मोहुर्ले, कोषाध्यक्ष बंडू खोब्रागडे, सहसचिव नेहा रामटेके, प्रवक्ता रवींद्र लोणारे, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद खोब्रागडे यांची तर सदस्य म्हणून मनीषा मेश्राम, आश्विनी जांभुळकर, पल्लवी डोंगरे, वर्षा पडघन, दिगांबर पिल्लावन, प्रशिक रामटेके, सुरेश बांबोळकर व दुष्यंत तुरे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते शिवासन ढवळे, देवानंद जांभुळकर, सुरेश बांबोळे, नरहरी खोब्रागडे व देवेंद्र बांबोळे यांना नियुक्त करण्यात आले.