सर्वसाधारण सभेत विकासावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:13 PM2018-12-04T23:13:12+5:302018-12-04T23:13:38+5:30

गडचिरोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ४ डिसेंबर रोजी पार पडली. या सभेत शहरातील विकास कामांवर चर्चा झाली. तसेच अनेक विकासकामांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.

Discussion on development in the General Assembly | सर्वसाधारण सभेत विकासावर चर्चा

सर्वसाधारण सभेत विकासावर चर्चा

Next
ठळक मुद्देप्रस्तावांना एकमताने मंजुरी : गडचिरोली शहरातील कामे लागणार मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ४ डिसेंबर रोजी पार पडली. या सभेत शहरातील विकास कामांवर चर्चा झाली. तसेच अनेक विकासकामांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.
शिवाजी महाविद्यालय ते रेड्डी गोडाऊनकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजी कॉलेजच्या समोर असलेल्या टी पार्इंटला स्व. बाबुरावजी नारायण मडावी यांचे नाव देणे, धानोरा मार्ग ते रेड्डी गोडाऊनकडे जाणाºया रोडवरील अ‍ॅड. तरारे यांच्या घराजवळील चौकाला डॉ. केशवराव हेडगेवार यांचे नाव देणे, याच मार्गावरील बंडू ताकसांडे यांच्या घराजवळील मार्गाला स्व. मुरलीधर विठोबा बद्दलवार यांचे नाव देणे, कैकाडी समाजाच्या वस्तीत सेवा पुरविणे, नगर परिषद शाळेतील मुलांच्या क्रीडा संमेलनासाठी निधी उपलब्ध करून देणे, सेवानिवृत्त कर्मचारी के. डब्ल्यू. उईके यांना नगर पालिकेचे काम करण्यासाठी पुढील एक वर्षासाठी करारबध्द करण्यात आले. नगर पालिका अनुदान, दलित वस्ती नगरोत्थान योजनेंतर्गत विकासकामे करणे आदी ठराव मंजूर करण्यात आले. हरीतपट्टा विकसीत करण्यासाठी शासनाकडून ५० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून झाडांची लागवड केली जाणार आहे.
शहरातील सर्वच भागांना पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पाईपलाईनमध्ये नवीन वाल्व बसवून वार्डांचे झोन पाडले जातील. या कामासही मंजुरी देण्यात आली. नगर परिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्रावर क्लोरीन गॅस सिस्टम बसविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुख्याधिकारी संजीव ओहोड, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, महिला व बाल कल्याण सभापती रंजना गेडाम, नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, बाबुराव मडावी, पुजा बोबाटे आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion on development in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.