लसीकरणानंतरच्या तापावरून परिणामकारकतेच्या चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:44 AM2021-09-07T04:44:05+5:302021-09-07T04:44:05+5:30
काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येते. विशेष करून काेविशिल्ड लस घेतल्यानंतर काही नागरिकांना माेठ्या प्रमाणात ताप येते तर काही जणांना ...
काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येते. विशेष करून काेविशिल्ड लस घेतल्यानंतर काही नागरिकांना माेठ्या प्रमाणात ताप येते तर काही जणांना कमी प्रमाणात ताप येते. तसेच काेव्हॅक्सीन लस घेतल्यानंतर तुलनेने कमी प्रमाणात ताप येते. असा नागरिकांचा अंदाज आहे. जास्त ताप आल्यास लस परिणाम कारक ठरली असा काहीसा अंदाज नागरिकांकडून बांधला जाते. त्यामुळे लस घेतल्यानंतर ताप यावाच अशीही अपेक्षा काही नागरिक करीत असल्याचे दिसून येतात.
बाॅक्स
तापवाली की विनातापवाली
राज्यभरात काेविशिल्ड व काेव्हॅक्सीन या दाेनच लस दिल्या जात आहेत. काेव्हॅक्सीनच्या तुलनेत काेविशिल्डमुळे अधिक ताप येेतेे, अशी माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. मात्र नेमक्या काेणत्या लसमुळे ताप येते याचे नाव माहीत नाही. त्यामुळे काेणती लस घेतली असे विचारताना तापवाली की विनातापवाली, असे विचारले जाते. त्याचे उत्तरही असेच दिले जाते.
बाॅक्स
ताप का येते ?
लसच्या माध्यमातून शरीरात काही विषाणू साेडले जातात. हा विषाणू बाहेरचा असल्याने त्याला मारण्यासाठी आपले शरीर प्रतिपिंडे (ॲन्टीबाॅडी) तयार करते. हा लढा देऊन प्रतिपिंडे तयार करताना शरीराला बरीच मेहनत घ्यावी लागते. यातून ताप, अंगदुखी, डाेकेदुखी आदी लक्षणे दिसून येतात. मात्र ही लक्षणे एक ते दाेनच दिवस टिकतात.
- एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती अधिक असल्यास ताप येत नाही. तर प्रतिकारशक्ती कमी असल्यास ताप येते. तसेच यापूर्वीच जर काेराेना हाेऊन गेला असल्यास त्याला फारसा ताप येत नाही.
बाॅक्स
तापावरून परिणामकारकता माेजू नये
काेविशिल्डच्या तुलनेत काेव्हॅक्सीनने ताप कमी येत असला तरी काेव्हॅक्सिन कमजाेर आहे. असा गैरसमज नागरिकांनी करून घेऊ नये. दाेन्ही लस प्रभावी आहेत. प्रत्येक लसची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
काेट
लस घेतल्यानंतर ताप येणे किंवा न येणे ही बाब त्या व्यक्तीच्या राेगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून राहते. त्यामुळे नागरिकांनी लसीची परिणामकारकता तापावरून माेजू नये. दाेन्ही लस सारख्याच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. काेणतीही भीती व शंका न बाळगता जी लस उपलब्ध हाेईल ती लस घ्यावी.
- डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा लसीकरण अधिकारी
बाॅक्स
एकूण लसीकरण ४,५४,८४१
पहिला डाेज ३,५८,३९६
दुसरा डाेज ९,६४,४५
’’’’’’’’’’’’’’’
काेव्हॅक्सिन ३,५०,६३१
काेविशिल्ड १,०४,२१०
’’’’’’’’’’’’’’’’’’’
१८- ४४ वय- २,२४,३६०
४५-६० वय १,४६,००७
६०च्या पुढे ८४,४७४