शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा
By admin | Published: June 22, 2017 01:34 AM2017-06-22T01:34:36+5:302017-06-22T01:34:36+5:30
राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत
कर्जमाफीचे स्वागत : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी भेटले
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
उद्योगविरहित व आदिवासी बहुल जिल्ह्यात ८० टक्के नागरिकांचे जीवन शेतवर अवलंबून आहे. सिंचनाची सोय अत्यल्प प्रमाणात असल्याने पावसाच्या पाण्यावरच लोक शेती व्यवसाय करतात. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ जिल्ह्यात पडतो. त्यामुळे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करू शकत नाही. येथील अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी सध्या खरीप हंगामात व्यस्त आहे, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.
यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते, जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश नागापुरे उपस्थित होते.