आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
By admin | Published: October 20, 2016 02:29 AM2016-10-20T02:29:53+5:302016-10-20T02:29:53+5:30
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभा १६ आॅक्टोबर रोजी रविवारला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
आंदोलनाची दिशा निश्चित : जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभा
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची सभा १६ आॅक्टोबर रोजी रविवारला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव विनोद सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या सभेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलू वानखेडे, अनिल मंगर, मोहन भुरसे, आंबोने, रणदिवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विनोद सोनकुसरे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सभेत आरोग्य कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती, एलएचव्हीचे अतिरिक्त पदे रिक्त पदावर समायोजित करणे, सेवाविषयक व सेवानिवृत्ती प्रकरण त्वरित निकाली काढणे, शासन निर्णयाप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चवथ्या शनिवारी रजा मंजूर करणे आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कुटुुंब कल्याण शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून सहकार्य मिळत नाही. यामुळे कुटुंब कल्याण शिबिरावर बहिष्कार करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. संचालन आनंद मोडक यांनी केले तर आभार प्रवीण गेडाम यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)