आंबेडकर साहित्य परिषदेच्या बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:38+5:302021-01-19T04:37:38+5:30
गडचिराेली : महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद, गडचिराेलीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहामध्ये साहित्यिक ॲड. शांताराम उंदीरवाडे यांच्या ...
गडचिराेली : महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद, गडचिराेलीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहामध्ये साहित्यिक ॲड. शांताराम उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गडचिराेली येथे २० व २१ फेब्रुवारी २०२१ राेजी आंबेडकरी साहित्य संमेलन आयाेजित करण्याचे ठरविण्यात आले. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, विलास थाेरात, प्रेमकुमार खाेब्रागडे, डाॅ. चंद्रशेखर बांबाेळे, समीर कदम, प्रा. संजय सुरळकर, नीशा शेंडे, कुसूम अलाम, सरिता सापर्डे, सरिता रामटेके आदी जणांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. संमेलनाचे उद्घाटन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याहस्ते हाेणार असून, मार्गदर्शक म्हणून आ. जाेगेंद्र कवाडे, तर स्वागताध्यक्ष जि. प. सदस्य ॲड. राम मेश्राम उपस्थित राहणार आहेत. बैठकीला संमेलनाचे आयाेजक मुनीश्वर बाेरकर, डाॅ. चंद्रशेखर बांबाेळे, श्रीनिवास गेडाम आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित हाेते.