बंगाली बांधवांच्या समस्यांवर सभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:42 AM2021-09-12T04:42:04+5:302021-09-12T04:42:04+5:30

सभेला आ. डाॅ. देवराव हाेळी, प्राचार्य शैलेंद्र खराती, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, दीपक हलदर, विधान व्यापारी, युद्धिष्ठिर ...

Discussion in the meeting on the problems of Bengali brothers | बंगाली बांधवांच्या समस्यांवर सभेत चर्चा

बंगाली बांधवांच्या समस्यांवर सभेत चर्चा

Next

सभेला आ. डाॅ. देवराव हाेळी, प्राचार्य शैलेंद्र खराती, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, दीपक हलदर, विधान व्यापारी, युद्धिष्ठिर विश्वास, प्राचार्य मनाेरंजन मंडल, बादल शहा, बासू मुजुमदार, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, महामंत्री निखिल हलदार, विधान वैद्य यांच्यासह परिसरातील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंगाली बांधवांच्या जमिनीचे पट्टे मिळावे याकरिता जमीन मोजण्यासाठी १ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र निधीअभावी सदर काम रखडले आहे. यासाठी लागणारा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी यावेळी केली. १९६८ पर्यंत आलेल्या बंगाली बांधवांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळतो; परंतु आपल्या जिल्ह्यात १९७२ पर्यंत मोठ्या प्रमाणावर बंगाली बांधव निर्वासित झाले. त्यामुळे सदर नियमात बदल करून तो १९७२ पर्यंत करावा. चेन्ना कारवाफा प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी १९८० चा असलेला वन कायदा हा मोठा अडसर असून त्याबाबत आपण शासनस्तरावरून नियमित पाठपुरावा करून हा कायदा शिथिल करण्याची मागणी करीत आहोत, असेही आ. डाॅ. हाेळी म्हणाले.

Web Title: Discussion in the meeting on the problems of Bengali brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.