केंद्रप्रमुखांच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:17+5:302021-06-09T04:45:17+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम मेश्राम होते. सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये सचिवपदी दिलीप ...
सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम मेश्राम होते. सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये सचिवपदी दिलीप मुप्पिडवार, कोषाध्यक्ष विजय बन्सोड, कार्याध्यक्ष राजेश वडपल्लीवार, उपाध्यक्ष लता चौधरी, बंडू खोब्रागडे, सहसचिव सदानंद ताराम, महिला प्रतिनिधी स्नेहलता तुलावी, संध्या मोडे, कुमुद भराडे तर तालुका प्रमुख म्हणून पुरुषोत्तम चापले, रामचंद्र मुंगमोडे, ब्रम्हानंद ऊईके, आनंद गुरनुले, येलेश्वर कोमरेवार, नंदगिरवार, मेकलवार, निखाडे यांची जिल्हा कार्यकारीणीत निवड करण्यात आली.
यासोबतच राज्य प्रतिनिधी म्हणून राजेश कोत्तावार तर विभागीय प्रतिनिधी म्हणून नेताजी मेश्राम यांच्या नावाला एकमताने मान्यता देण्यात आली. दरम्यान जिल्हाध्यक्ष गौतम मेश्राम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सभेचे संचालन दिलीप मुप्पिडवार तर आभार विजय बन्सोड यांनी मानले. सभेला मोरेश्वर रामटेके, दुष्यंत तुरे, संजय कसबे, शालिक डोंगरवार, राजेंद्र कानकाटे, प्रकाश माकोडे, गुरुदास गोमासे, हिंमतराव आभारे, किरणकुमार शेंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
080621\08gad_4_08062021_30.jpg
===Caption===
मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख विजय बन्साेड, तसेच उपस्थित पदाधिकारी.