शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:46 AM2019-01-26T00:46:21+5:302019-01-26T00:46:52+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांच्यासोबत गुरूवारी चर्चा केली. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

Discussion on teachers' issues | शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा

शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा

Next
ठळक मुद्देनिवडश्रेणी देण्याची मागणी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांच्यासोबत गुरूवारी चर्चा केली. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
शालेय पोषण योजनेअंतर्गत मिळणारा इंधन, भाजीपाला खर्च यामध्ये फार मोठी तफावत आहे. प्रत्यक्ष बिल सादर केल्यापेक्षा कमी प्रमाणात बिलाला मंजुरी दिली जाते. शालेय विज बिलाची रक्कम जिल्हा परिषदेने भरावी, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी, स्थायी व नियमितचे प्रस्ताव कार्यवाहीसाठी पाठवावे, सहाव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्यावे, बदली प्रवास देयके द्यावी, शिक्षकांच्या पगारातून कपात होणाऱ्या कर्ज, शैक्षणिक अर्हतेच्या नोंदी सेवापुस्तकात कराव्यात, वैद्यकीय प्रतीपूर्ती प्रस्ताव निकाली काढावे, एप्रिल २०१८ च्या वेतनातून कपात केलेले एक दिवसाचे वेतन त्वरित द्यावे आदी मागण्यांसंदर्भात गटशिक्षणाधिकाºयांसोबत चर्चा केली.
या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकाºयांनी दिले. यावेळी शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष नीलेश खोब्रागडे, तालुका कार्यवाह प्रदीप भुरसे, उपाध्यक्ष शिरीष ईरावार, संतोष नागरगोजे, कार्याध्यक्ष मारटकर, जिल्हा संघटक सुरेंद्र धकाते, प्रसिद्धी प्रमुख गणेश उईके, नरेश सोरते, लोमेश मेश्राम, ज्ञानेश्वर वैद्य आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion on teachers' issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक