दारूमुक्त निवडणुकीबाबत तहसीलदारांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:37+5:302020-12-30T04:45:37+5:30
धानोरा : मुक्तिपथ तर्फे ''''''''दारूमुक्त निवडणूक'''''''' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता व धानोराचे ...
धानोरा : मुक्तिपथ तर्फे ''''''''दारूमुक्त निवडणूक'''''''' अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता व धानोराचे तहसीलदार पित्तुलवार यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी तालुकाभरात दारूमुक्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चर्चा करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्हा, तालुका प्रशासन व मुक्तिपथ द्वारा दारूमुक्त निवडणूक अभियान राबविले गेले. ८५० गावांनी दारूमुक्त ठराव घेऊन सर्व पक्ष अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते. परिणाम स्वरूप निवडणुकीत उभे असलेल्या सर्व उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी संकल्प केला. मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचे वाटप होऊ शकते. दारू वाटणे किंवा पाजणे हा निवडणुकीच्या नियंत्रणाचा भंग होईल. हा गुन्हा आहे. त्यामुळे धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी डॉ. गुप्ता यांनी तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांच्याशी चर्चा करून दारूमुक्त निवडणुकीचे नियोजन केले. यात मुक्तिपथ तालुका चमूच्या माध्यमातून गावागावात ''''''''दारूमुक्त निवडणूक'''''''' संदर्भात जनजागृती केल्या जाईल. स्थानिक प्रशासन सुद्धा दारूचे वाटप होणार नाही याची दक्षता घेणार. उमेदवारांकडून ''''''''मी दारूचे वाटप करणार नाही'''''''' अशा आशयाचे संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन व मुक्तिपथ संयुक्तरित्या दारूमुक्त निवडणुकीसाठी प्रयत्न करणार आहे.