देसाईगंजातील वाॅर्डांमध्ये निर्जंतुकीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:27+5:302021-04-27T04:37:27+5:30

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची स्थिती बिकट हाेत आहे. कोरोनाबाधितांसह मृतांच्या आकडेवारीतही कमालीची वाढ होत असल्याने शहरासह तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

Disinfect wards in Desaiganj | देसाईगंजातील वाॅर्डांमध्ये निर्जंतुकीकरण करा

देसाईगंजातील वाॅर्डांमध्ये निर्जंतुकीकरण करा

Next

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची स्थिती बिकट हाेत आहे. कोरोनाबाधितांसह मृतांच्या आकडेवारीतही कमालीची वाढ होत असल्याने शहरासह तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

देसाईगंज शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून लगतच्या तालुक्यासह बाहेर जिल्ह्यातील नागरिक येथे येतात. कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यातूनही नागरिकांचे आवागमन आहे. तालुक्यात सध्या ६०० वर कोरोनाबाधित रुग्ण असून यापैकी अनेक रुग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात, काही शासकीय कोरोना सेंटरमध्ये, काही खासगी रुग्णालयात तर काही गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. काेराेनाने तालुक्यातील ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गृह विलगीकरणात असलेले काही कोरोनाबाधित नियमांना हरताळ फासून चक्क चारचौघात मिसळत आहेत. बाधितांच्या माध्यमातून कोरोनाचा अधिक उद्रेक होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहराच्या प्रत्येक वाॅर्डात फिरत्या वाहनाने निर्जंतुकीकरण फवारणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आनंद चावला, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद सपाटे, मनोज ढोरे यांनी केली. निवेदन कर्मचारी बोंद्रे यांनी स्वीकारले.

===Photopath===

260421\26gad_8_26042021_30.jpg

===Caption===

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारताना कर्मचारी बाेंद्रे.

Web Title: Disinfect wards in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.