युवती महोत्सवातून सुप्त कलागुणांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:06+5:302021-02-27T04:49:06+5:30
महाराष्ट्र राज्य नृत्य परिषदेच्या वतीने स्थानिक विवेकानंद विद्यालयात तालुकास्तरीय युवती महोत्सव घेण्यात आला. यात कोरची, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, धानोरा, ...
महाराष्ट्र राज्य नृत्य परिषदेच्या वतीने स्थानिक विवेकानंद विद्यालयात तालुकास्तरीय युवती महोत्सव घेण्यात आला. यात कोरची, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, धानोरा, गडचिरोली व आरमोरी तालुक्यातील युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महोत्सवात रांगोळी, वेशभूषा, डिश डेकोरेशन, पारंपरिक आदिवासी लोकनृत्य, समूह नृत्य, युगल नृत्य, एकल नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत भाग घेऊन युवतींनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांची उधळण केली. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नृत्य कलाकारांचे यावेळी उपस्थितांनी भरभरून कौतुक करून प्रतिसाद दिला. युवती महोत्सवाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील युवतींना एक हक्काचा मंच मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष प्रेरणा गाराेदे यांच्या नेतृत्वात नृत्य परिषदेचे शाखा कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण सहारे, अभिषेक वाळवे, प्रशांत म्हशाखेत्री, राकेश सोनकुसरे, प्रतीक भैसारे, चेतन ठाकरे, प्रदीप बोडणे, डॉ. परशुराम खुणे, भूषण खंडाते, नागसेन गोडसे यांनी सहकार्य केले.