स्वयंपाकाच्या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि भाऊ भावाच्या जीवावर उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:36 AM2021-04-06T04:36:04+5:302021-04-06T04:36:04+5:30

महेंद्र रामटेके आरमोरी: एकाच घरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये स्वयंपाकाच्या कारणावरून आदल्या रात्री कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात ...

Disputes erupted over cooking, and the brother-in-law was killed | स्वयंपाकाच्या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि भाऊ भावाच्या जीवावर उठला

स्वयंपाकाच्या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि भाऊ भावाच्या जीवावर उठला

Next

महेंद्र रामटेके

आरमोरी: एकाच घरात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये स्वयंपाकाच्या कारणावरून आदल्या रात्री कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मोठ्या भावाने लहान भावाला लाथा बुक्क्याने मारहाण केली. तोच राग मनात ठेवून मोठा भाऊ झोपला असताना लहान भावाने मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. क्षुल्लक कारणावरून भाऊ भावाच्या जीवावर कसा उठला हे लक्षात येते. या घटनेत गणेश नैताम हा घटनास्थळी मृत पावला. याप्रकरणी मृतकाचा लहान भाऊ विकेश याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार आरमोरीतील शेगाव टोली येथे गणेश ताताजी नैताम वय २८ व विकेश ताताजी नैताम वय २६ हे दोघे सख्खे भाऊ आपल्या आईसोबत राहत होते. दोघेही अविवाहित होते आणि मोलमजुरी करून पोट भरत होते. मात्र या दोन भावांमध्ये या ना त्या कारणावरून नेहमीच खटके उडायचे. त्यामुळे दोघा भावांत फारसे पटायचे नाही. घटनेपूर्वी त्यांची आई ही मिरची ताेडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेली होती. विकेश हाही मजुरी साठी बाहेरगावी गेला होता. मात्र होळीसाठी तो आरमोरी येथे परत आला. ३ मार्चला स्वयंपाकावरून दोघा भावात कडाक्याचे भांडण झाले. आणि यामध्ये मोठा भाऊ मृतक गणेश याने लहान भाऊ विकेश याला लाथा बुक्क्याने मारहाण केली. आणि तोच राग मनात ठेवून विकेश याने गणेश हा झोपला असताना संधी पाहून रविवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान डोक्यावर व छातीवर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडला. सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाला यमसदनी पाठविले. कारण क्षुल्लक होते. मात्र त्या क्षुल्लक कारणाचे पर्यावसान हत्येपर्यंत पोहचले.

याप्रकरणी आरोपी भाऊ विकेश याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माेठ्या भावाकडून रात्री झालेल्या मारहाणीत आरोपीला दुखापत झाल्याने आरोपी हा रुग्णालयात आहे . त्याला मंगळवारी कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. घटनेचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे करीत आहेत.

Web Title: Disputes erupted over cooking, and the brother-in-law was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.