तंटे मिटविण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:27 AM2020-12-27T04:27:03+5:302020-12-27T04:27:03+5:30
मुलचेरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र ...
मुलचेरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या पे्रमीयुगुलांचे विवाह लावून देण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
जि.प. मध्ये लिफ्टचा प्रस्ताव प्रलंबितच
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र सदर प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृध्द व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कार्बाइडने पिकविलेल्या फळांचा वापर सुरूच
आलापल्ली : विविध प्रकारची फळे कृत्रिमरित्या कॅल्शिअम कार्बाइडने पिकविल्या जात असून अशा फळांची गडचिरोली जिल्ह्यात आयात मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी असे फळ खाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र याकडे अन्न पुरवठा विभागाचे दुर्लक्ष आहे. कडक नियम असतानाही हा प्रकार सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते.
सिलिंडरच्या वैधतेबाबत नागरिक अनभिज्ञ
आरमोरी : ग्राहक जागृतीसाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत असले तरी काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक ग्राहकांकडे वैधता संपलेले जुने सिलिंडर आहेत. सदर ग्राहक याच सिलिंडरचा वापर करीत आहे. मात्र सदर सिलिंडरपासून केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरवठा विभागाने याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.
मामा तलावांमधील अतिक्रमण हटवा
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकºयांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आणखी एक पाणी टाकी बांधण्याची मागणी
चामोर्शी : चामोर्शी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी एका पाणी टाकींचे बांधकाम करण्याची गरज आहे. नगर पंचायतीने याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चामोर्शी शहरातील काही वॉर्डाना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे.
सेमाना परिसरात हायमॉस्ट लाईट लावा
गडचिरोली : सेमाना परिसरात वन विभागाचे उद्यान असल्याने या परिसरात पहाटे व सायंकाळच्या सुमारास ये-जा करणाºयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात हायमॉस्ट लाईट लावण्याची मागणी होत आहे.
वयोवृध्द ओबीसींना तीन हजार रूपये पेन्शन द्या
आलापल्ली : जिल्ह्यात वयोवृध्द ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर प्रती महिना तीन हजार रूपये वृध्दापकालीन अर्थसहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
कुरखेडा रूग्णालयातील खाटांची संख्या वाढवा
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. या रूग्णालयात कुरखेडा, कोरची, देसाईगंज तालुक्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे १०० खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुद्रा योजनेंतर्गत कर्ज पुरवठा वाढवा
देसाईगंज : केंद्र शासनाने उद्योगांना कर्जाचा पुरवठा करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सव्वादोन हजार उद्योजकांना २१ कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. शेकडो युवकांचे अर्ज बँकेमध्ये पडून आहेत. प्रशासकीय यंत्रणेने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली नाही. दुर्गम भागातील बेरोजगार या योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
देवदा-रेगडी मार्गाची अवस्था बकाल
चामोर्शी : तालुक्यातील घोट परिसरातील देवदा-रेगडी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. चामोर्शी व एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाची वाहतुकीसाठी अडचण येत आहे. या मार्गावर चालणारी खासगी वाहने प्रचंड खराब झाली आहेत. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे बसेस भंगार होत आहेत.